ना.गिरीषभाऊ यांनि केली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सोय

जळगाव | प्रतिनिधी
सण २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील आरोग्य विज्ञान प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या (नीट युजी -२०१९) शासन अनुदानित / खाजगी महाविद्यालयाच्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक गुणवत्ता यादीनुसार समुपदेशन व कागदपत्र पडताळनी प्रक्रिया दिनांक २९ जुने, २०१९ ते ०४ जुलै, २०१९ या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव या केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. त्या बाबतची अधिसूचना आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, यांचे अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. या करिता ना. गिरीषभाऊ महाजन यांनि जिल्हातील मेडिकल च्या विद्यार्थ्यांच्या सोई करिता मोफत कौन्सिलीग केद्र सुरु करण्याचे सुचित केले होते. यापूर्वी जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांना समुपदेशन व कागदपत्रे पडताळणीसाठी औरंगाबाद येथे जावे लागायचे. या प्रश्नावर जिल्हातील पालकांनी मा.ना.गिरीषभाऊ महाजन , मंत्री वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा, महाराष्ट्र शासन यांचे लश्य वेधले होते त्यांच्या माध्यमातून सदर समुपदेशन व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया केंद्रस जळगाव वैद्यकीय महाविद्यालयस मान्यता मिळाली आहे. सदर प्रक्रियेसाठी केंद्र अधिष्ठाता म्हणून डॉ. भास्कर खैरे, केंद्र प्रमुख म्हणून डॉ.किशोर इंगोले, प्राध्यापक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, केंद्र निरीक्षक म्हणून डॉ.सी डी. डांगे, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांची नेमणूक करण्यात आली आहे. तरी सर्व पालक व विद्यार्थी यांनी सदर प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा.

