Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»विनापरवानगी बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने? आ.चंद्रकांत पाटीलांनी केली नाराजी व्यक्त
    ताज्या बातम्या

    विनापरवानगी बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने? आ.चंद्रकांत पाटीलांनी केली नाराजी व्यक्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    सावदा येथील विनापरवानगी बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती? संबंधितांकडे बायोडिझेल विक्रीचा कोणताही परवाना नसतानांही  विक्री कशी सुरू होती? असे अनेक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी रावेर तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली.

    फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेऊन आ.‌ पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. यात कोणी अधिकारी दोषी असेल त्यांची मी स्वतः तक्रार करणार आहे.  त्यामुळे बायोडिझेल विक्रीसाठी कोठून उपलब्ध होते,  याबाबत महसूल अधिकारी यांनी याचा तपास केला का? तसेच पोलिस प्रशासन यांना कारवाई साठी पत्र अथवा गुन्हा का दाखल केला नाही? असे अनेक सवाल उपस्थित करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

    बुधवारी एक वाजता प्रांताधिकारी कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेतली व बायोडिझेल विक्रीची कोणतीही परवानगी नसताना सावदा विभागात बिनधास्तपणे बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? यात मागील एका आठवड्यात फक्त सावदा हद्दीतील बायोडिझेल पंपावर सील केले ही कारवाई रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी कारवाई केली मात्र याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली नाही किंवा बायोडिझेल पंपचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी का पाठवले नाही? त्यामुळे महसूल अधिकारी यांच्या कार्यप्रणाली वर शंका उपस्थित होत आहे. यात काही आर्थिक चिरी-मिरी तर नाही ना? असा थेट सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले व वस्तूनिष्ठ अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्याचे सांगितले.

    याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक अमोल निंबाळे,शेख शाकिर शेख इमाम, शिवसेना उपतालुका प्रमुख राजू काठोके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    तहसिलदार देवगुणे मॅडम यांची भुमिका संशयास्पद- आ. पाटील

    सावदा हद्दीत विनापरवानगी सुरू असलेल्या बायोडिझेल पंपावर कारवाई केली पण पुढील रितसर पोलीस फिर्याद दिली नाही तसेच सदर बायोडिझेल पंपाचे सॅम्पल घेऊन तपासणी पाठवले नाहीत यासर्व प्रकारामुळे रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif