विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

0

लासगाव, ता.पाचोरा (प्रतिनिधी) :राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका फार मोलाचे असते पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो परंतु तो शिक्षकावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे बरेच शिक्षकांना ही वेळ आज आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून विलास काळे त्याच वय 44 आहे आयुष्यातील 16 वर्ष विनावेतनात गेली सदर शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा जिल्हा जळगाव येथे गेल्या 2004 पासून विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय वर काम करीत आहेत उत्पन्नाचं साधन कोणते नाही घरी शेतीही नाही त्यांना दोन मुलं एक मुलगा दहावीला जातो त्याचा आहे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे एक मुलगी तिसरी शकते घरची शेती नसल्यामुळे गावातच असलेल्या धीरज देवी पतसंस्था मध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करतात व पत्नी शेतात मजुरी करून त्याचा उदर निर्वा होत होता परंतु गेल्या दोन महिन्यापासून कोरोणाच्या आपती सर्व व्यवहार ठप्प झाले आणि त्यामुळे कोणते प्रकारचे वसुली पतपेढी कडून केले जात नाही त्यांना मिळणारे कमिशन ते मिळत नाही त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आज आलेली आहे
गेल्या सोळा वर्षांपासून बिनपगारी काम करत आहेत पण अजून पगार नाही. सध्या कोरोना मुळे संकट निर्माण झाले आहे.शासनापुढे कोरोनाची फार मोठी गंभीर समस्या आहे याची जाणीव आहे. आज पुर्ण राज्यात उच्च माध्यमिक साडे बावीस हजार बांधव बिनपगारी काम करत आहे. आज आमच्यावर आर्थिक आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगावं की मरावं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. अगोदरच बिनपगारी काम करता करता पैसे उसने घेतले आहेत. आज समाजामध्ये मानपान ह्या कोणत्याच गोष्टी आमच्या नशिबामध्ये नाही. परिवाराचा खर्च कसा भागवायचा हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक तरतूद झालेली असताना सुद्धा. वेतन अनुदान वितरित करण्याचा जीआर निघालेला नाही.तरी मायबाप सरकारने आमच्या वेतन अनुदानाचा जीआर लवकरात लवकर काढावा ही विनंती.

“परिवाराचा खर्च भागवण्यासाठी पैसे नाहीत.आज माझ्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे.माझ्यासारखे अनेक बिनपगारी महाराष्ट्रातील तमाम उच्च माध्यमिक शिक्षक याच पद्धतीने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसाबसा चालवत आहे.आणि संसाराचा गाडा रेटत आहे.धड जगताही येईनाआणि मरता ही येईना. म्हणून शासनाने तात्काळ जीआर काढावा आणि आम्हाला अभय द्यावे ही नम्र विनंती.

-विलास काळे
कनिष्ठ महाविद्यालय विनाअनु दानित शिक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.