यावल | प्रतिनिधी
येथील विस्तारीत परिसरातील कॉलनीत एका तरूणीचे विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणाविरूथ्द पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अनुसार यावल शहरातील गणेशनगर कॉलनीत राहणारी फिर्यादी चे वडील घरी नसतांना तरूणी ही आपल्या दोन बहीणी सोबत घरात असतांना घरासमोर काल दिनांक २१ जुन रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंगणात झाडणे करीत असतांना दिपक उर्फ विनोद सुरेश पाटील यांने दारूच्या नशेत फिर्यादी तरुणीशी वाद घालुन हात पकडुन लज्जा वाटेल असे कृत केल. या बाबत तरूणीने फिर्याद दिल्याने यावल पोलीसात दिपक उर्फ विनोद सुरेश पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.