Thursday, February 2, 2023

विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदेविषयक शिबीराची सांगता

- Advertisement -

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावल येथे तालुका विधी सेवा प्राधीकरण  व तालुका वकील संघातर्फे आयोजीत शिबीराच्या  निमित्ताने मागील  ४४ दिवसांपासुन तालुक्यात सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या अआयोजित कायदेविषयक शिबीरांच्या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

दिनांक १४ नोव्हेबर रोजी न्यायधिशांच्या सायकल रैलीने झाली. यावल तालुक्यातीत संपन्न झालेल्या कायदेविषयक शिबीरांना मोठा प्रतिसाद मिळाला असुन, यावल येथील न्यायालयातून आज संपुर्ण तालुक्यात यशस्वीरित्या पार पडलेल्या कायदेविषयक शिबीराची सायकल व पायी रॅली काढुन सांगता करण्यात आली. सदर रॅली न्यायालयातून निघून यावल शहरातील प्रमुख मार्गावरील श्रीराम किराणा, बेहडे शॉपी, युसुफ बँड, म्हसोबा मंदिर, महाजन गल्ली, बोरावल गेट, पोस्ट ऑफिस मार्ग, नगर परिषद या मार्गाने निघालेली रॅली परत न्यायालयात आली.

- Advertisement -

न्यायालयाच्या आवारात सदर महोत्सवाचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. त्यात विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. एम. एस. बनचरे, सहन्यायाधीश व्ही. एस. डामरे, वकील संघ यावलचे  तालुका अध्यक्ष अॅड धीरज चौधरी, सचिव अॅड एन. पी. मोरे, वकिल संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, अॅड. शशिकांत वारूळकर, अजय बढे, हेमंत फेंगडे, विधी विद्यार्थी यांनी हजर राहुन यात आपला सहभाग नोंदवला. यावल येथे दोन दिवसापुर्वी संपन्न झालेल्या जिल्हा कायदेविषयक शिबीरास अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता हे या शिबीराचे फलीत म्हणावे लागेल.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे