जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना उपनेत्या विधानसभा परिषदच्या उपसभापती सौ. निलम गो-हे यांचे अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले.
जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन , उपमहापौर कुलभूषण पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.