विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन ना. गुलाबराव पाटील आक्रमक…. म्हणाले

0

भडगाव : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. ‘सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन. भोगावे लागले इथेच’, असे वक्तव्य ना.पाटलांनी केले. येथील एका कार्यक्रमात प्रसंगी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसेच आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर मत मांडले.

दरम्यान, यावेळी ना, गुलाबराव पाटलांनी विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. लोकसभा निवडणुकीवेळी आमची भाजपसोबत युती होती. भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी आम्ही अंग झटकून मेहनत केली. रात्रीचा दिवस केला. त्यांचा चहाही प्यायलो नाही. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने युती धर्माचे पालन केले नाही. आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात बंडखोर पेरले. सालेहो सेटींग करता, तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.