Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»विधानपरिषद उमेदवारीवर एकनाथराव खडसेंनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा….
    जळगाव

    विधानपरिषद उमेदवारीवर एकनाथराव खडसेंनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा….

    By May 4, 2020No Comments13 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी मतदान होत आहे. यात भाजपच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, विधानपरिषदेवर तरी आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

    राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पक्षातर्फे आपल्याला विचारणा झाली होती, त्यावेळी महाराष्ट्र भाजपने आपल्या नावाची राज्यसभेसाठी शिफारसही केली होती. मात्र, राज्यसभेत रस नसल्याचे आपण श्रेष्ठींना स्पष्टपणे कळविले होते. त्यामुळे त्या कालखंडात ते होऊ शकले नाही. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून, विधानपरिषदेवर उमेदवारी देताना आपला विचार करण्यात यावा, अशी आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय पक्ष घेईल, याची खात्री आहे, असेही खडसे म्हणाले आहे.

    दरम्यान, खडसे यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे मोठी स्पर्धा लागली आहे. पक्षातर्फे माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी यांच्याही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. तथापि, खडसे यांनी आता स्वतःच मागणी केल्यामुळे पक्षनेतृत्वाला त्यांचा निश्‍चित विचार करावा लागणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026

    माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

    August 17, 2026

    अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif