चाळीसगाव:
विद्यार्थ्यानी वृक्षरोपण करुन संबधित वृक्षाचे सलग तीन वर्षापर्यत संगोपन केल्यास त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यास तीन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे आश्वासन आवादा फाऊडेशन प्रा.लि.च्या सोलर पावर प्रकल्पाचे संचालक दीपककुमार जेना यांनी दिले.पिंपरखेड तांडा येथील आश्रमशाळेत आवादा फाऊडेशन प्रा.लि.तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच झाला.त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजेश राठोड होते.यावेळी प्राचार्य आर.बी.उगळे ,मुख्याध्यापक एम.डी.बागुल,पर्यवेक्षक एस.एस.पवार,पी.डी.गुंजाळ ,व्ही .आर.बोरसे आणि आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मोरसिंग जाधव आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यानी अश्विनी राठोड व कल्याणी जाधव यांचा शिक्षिका मीना बागुल आणि कामिनी पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post