विद्यार्थ्यांच्या हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा –  स्मितलताई बोरसे

0

रयत सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शालेय साहित्य वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी –  शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उर्तीण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रयत  सेना व गुजरात अंबुजा तर्फे राबविण्यात आला हा कार्यक्रम कौतुकास्पद असुन शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम मोलाचा व आठवणीत  राहील असे सांगत  विद्यार्थ्यांच्या हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा  असल्याचे  प्रतिपादन चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापती सौ स्मितलताई बोरसे यांनी रयत सेना आयोजित  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी केले
रयत सेना व गुजरात अंबुजा यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता  येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात  शालेय साहित्य वाटप  व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन सौ बोरसे  बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की  विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा आहे अशा  विद्यार्थ्यांसाठी रयत सेनेचा  हा उपक्रम  त्यांच्यासह  सर्वांच्या आठवणीत राहील असे सांगत या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती उपसभापती संजय पाटील .पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड.  रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार .स्वाभिमानी भारतचे  संयोजक धर्मभूषण बागुल.उद्योगपती वर्धमान धाडीवाल. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील . गुजरात अंबुजा प्रकल्प अधिकारी वैभव पाटील. एच आर मॅनेजर योगेश काळे.प्रा रवी चव्हाण. नगरसेवक चिराग शेख .भिकन पवार .प्रगत संस्थेचे खुशाल पाटील.बबन पवार .कन्नड तालुका अध्यक्ष पप्पू पाटील. पत्रकार मुराद पटेल .खडकी बु चे  पोलीस पाटील विनायक मांडोळे आदि मान्यवर उपस्थित होते  कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज .डॉ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर रयत सेनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकातुन  गणेश पवार यांनी सांगितले की  रयत सेनेच्या माध्यमातून गेल्या १५ ते १६ वर्षांपासून सामाजिक. शैक्षणिक . आरोग्य . विद्यार्थी .शेतकऱ्यांच्या   समस्या सोडविण्यासाठी  नेहमी संघटना पुढे असते   यापुढे ही वंचित पिडीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार आहे इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उर्तीण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून जर वर्षी शालेय साहित्य वाटपाचे आयोजन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ म्हणाले की गणेश पवार यांची विद्यार्थ्यांसाठी असलेली  तळमळ  आम्ही नेहमी बघतो असे खूप कमी लोक असतात की ते दुसऱ्यासाठी झिजतात विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा खुप मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले  तर चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड  यांनी बोलताना सांगितले की  रयत सेना व  गुजरात अंबुजा यांनी आयोजित केलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.  गुजरात अंबुजा प्रकल्प अधिकारी वैभव पाटील म्हणाले की कोणाला कशाची गरज आहे हे ओळखून त्यांना काय देता आल पाहिजे हेच काम रयत सेनेच्या माध्यमातून गणेश पवार व त्यांचे सहकारी करत असल्याचे गौरवउदगार त्यांनी  काढले  तर  पंचायत समिती उपसभापती संजय पाटील म्हणाले की रयत सेना  या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे कोणाकडे किती पैसा आहे ते महत्त्वाचे नसून  दातृत्वातून देणे व समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी देणे हेच महत्त्वाचे असून  ते काम रयत सेनेच्या माध्यमातून गणेश पवार करीत आहेत विद्यार्थी गुणगौरव आणि शालेय साहित्य वाटप हा उपक्रम हीच मोठी सेवा आहे असे त्यांनी सांगितले  या कार्यक्रमात नालंदा विद्यालय. राष्ट्रीय विद्यालय. तहेजीब उर्दू हायस्कूल ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह    २००  विद्यार्थ्यांना दप्तर. वही. पेन . कंपास. पॅड. अदि  शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले
तर इयत्ता १० वी व इयत्ता १२  परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला  यावेळी प्रदेश समन्वयक पी एन पाटील. सचिव प्रमोद वाघ. जिल्हा अध्यक्ष संजय कापसे.शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष दीपक राजपूत .युवक जिल्हा अध्यक्ष आकाश धुमाळ. तालुका अध्यक्ष किशोर पाटील .शहराध्यक्ष योगेश पाटील. तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार .विलास मराठे.मनोज पाटील .शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे. आडगाव शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील . शिक्षक सेनेचे  जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण. शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष अजीज खाटीक .रवींद्र पाटील. विकास पवार .ऋषिकेश चव्हाण .जयदीप पवार. एकनाथ पाटील .सतीश पवार .सुनिल पवार. दिलीप पवार. भागवत कुमावत. रमेश पवार. रामदास पवार नालंदा विद्यालयाचे शिक्षक किरण कोळी  यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर कार्यक्रमास अधिक परीश्रम  स्वप्नील गायकवाड. सागर यादव. प्रवीण पवार.गौरव पाटील. अनिकेत शिंदे .मोहन भोई. चेतन पवार .कार्तिक पवार .गणेश पवार आदींनी घेतले तर सूत्रसंचालन सचिन नागमोती  व दीपक चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब पवार यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.