तहसिलदार बी. ए. कापसे यांचे आवाहन : तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
पाचोरा, दि. 30 –
विद्यार्थ्यांचा सार्वागिण विकास करावयाचा असेल तर जीवनात खेळाला महत्त्व द्यावे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाडू वृत्ती जोपासली गेली पाहिजे. खेळामूळे शरीर व मन निरोगी राहून यशस्वी होण्याचा मार्ग सुखकर होतो. खेळात यश आले तर भारावून जावू नये व अपयश आले तरी खचून जाऊ नका असे संबोधून पुन्हा उठून उभे रहा असे आवाहन तहसिलदार बी. ए. कापसे यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलमधे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन पंडित शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून सचिव अॅड. जे. डी. काटकर, प्राचार्य राजीव थॉमस, उपप्राचार्य स्टिम मारीया, प्रशासक जगदिश पाटील, क्रिडा शिक्षक सुनील मोरे, महिला क्रिडा शिक्षक मंगल बोरसे, तालुका क्रिडा समन्वयक सुधीर पाटील, प्रशांत नागणे उपस्थित होते.
पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलमधे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व शिंदे इंटरनॅशनल स्कुल यांचे संयुक्त विद्यमाने तालुका स्थरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.