पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांचा इशार : कार्यालयाला ठोकणार कुलूप
भुसावळ, दि.28 –
भुसावळ शहरातील यावल रोडवरील सेंट अलॉयसिस तसेच अन्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी मोठ्या रकमेचे डोनेशन घेवून दाखल केले जाते. गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणे कठीण झाल्यामुळे मध्यमवर्गीय मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाला अडचण निर्माण होत असल्याचा पीआरपीचे महामंत्री जगन यांनी पत्रकार परिषदेमध्ये महागड्या शाळांवर आरोप केला.
आज दि. 29 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सन 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी असून इतर शाळांमध्ये शिक्षक भरती केली असून शिक्षणाधिकार्यांनी त्याची चौकशी करा, याचीसुध्दा पत्रकार परिषदेमध्ये आरोप आहे. तसेच शाळांमध्ये बिल्डींग फी, संगणक फी, लॅब फी अशी फी ही घेता येत नाही कारण सरकार मान्यताप्राप्त हायस्कुलला अशी फी घेण्याचे कारण सुईचादेखील खर्च सरकार देते. अशा फीच्या
नावाखालीही गोरगरीब नागरीकांची लुट केली जात आहे. या फी वसुली व्यतिरिक्त प्रवेश फीच्या नावाखाली होणारी लुट ही अनेक वर्षांपासून सुरु आणि चर्च व धर्माची अनुदान
प्राप्त पावती व इतर बेकायदेशिर पावती दिली जात आहे ही गंभीर बाब आहे. जनतेचा पैसा संस्थाचालकांच्या खिशात जात आहे. हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. तसेच भुसावळ शहरामध्ये अनेक माध्यमिक हायस्कुल शासकीय मान्यताप्राप्त असतांनादेखील विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून सर्रास लुटमार सुरु आहे. के.नारखेडे हायस्कुल येथेही संगणक फी
नावावर विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये फी घेतली जाते तसे पाहिले तर शासनाने मुलींना 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले असतांना या विद्यालयातही सर्रास लुटमार सुरु आहे. याचीही चौकशी करुन संबंधित संस्थांवर बेकायदेशिर कारवाई करण्यात यावी. सन 2012 पर्यंत पूर्णपणे नोकरबंदी असतांना अनेक ख्रिश्चन धर्मियांना इथे बेकायदेशिर नोकरीवर ठेवण्यात आले आहे मग मुस्लिम, बौध्द या धर्मियांच्या महिलांना व पुरुषांना का नोकरी दिली जात नाही? ख्रिस्तीच का नोकरीवर बंदी असतांनाही भरती केले जातात
, याचीही चौकशी करण्यात यावी. कायद्याने एसीसी, एसटी,ओबीसी यांचे आरक्षण भरणे क्रमप्राप्त आहे हा बॅकलॉगही संस्थेने आतापर्यंत भरलेला नाही. 16 जून ते 31 जुलै 2018 पर्यंत प्रवेश प्रक्रिया असते. प्रवेश प्रक्रिया राबवितांना प्रवेशासाठी पालकांकडून फॉर्म भरले जाते त्यात ख्रिश्चन धर्मियांच्या प्रवेश फॉर्मला छाननीत प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यांच्यकिडून प्रवेश फही घेतली जात नाही. त्यांना प्रवेश फ माफ असते. मग इतर धर्मियांकडून का फी वसूल केली जाते. एकाच समाजला नोकरीमध्ये प्राधान्य देवून इतर समाजाच्या व्यक्तिला नोकरीत समाविष्ट करत नसल्याचा पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. 6 जुलै रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव जिल्हा परिषद दुपारी 2 वाजता कुलुप ठोकण्याचा इशारा जगन सोनवणे यांनी दिला. 9 जुलै रोजी रास्ता रोको, जेल भरो व जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सेंट अलॉयसिसला कुलुप ठोकण्याचा इशारा दिला. 12 जुलै रोजी सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत सेंट अलॉयसिसजवळ एकदिवसीय चेतावनी धरणा आंदोलन, 16 जुलै रोजी मुंबई येथे आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या माध्यमातून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट व लक्षवेधी सुचनाबद्दल चचार्क्ष व निवेदन सादर करणार आहे. तसेच 18 ते 20 जुलै दरम्यान सकाळी 10 वाजेपासून सेंट अलॉयसिस हायस्कुलजवळ हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असा पत्रकार परिषदेत इशारा दिला. यावेळी कामगारनेते पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था अध्यक्ष एस. पी. सपकाळे, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाध्यक्ष हरिष सुरवाडे, कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष आनंद सपकाळे, पीआरपी जिल्हा संघटक राजू डोंगरदिवे, राष्ट्रीय मोलकरीण सेना महिला जिल्हाध्यक्ष संगिता चंद्रकला कापडणे, तुषार विसपुते, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.