भडगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थी वाचवा या अराजकीय संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदी भडगाव येथील निलेश नेरकर यांनी नुकतीच निवड करण्यात आली आहे.आताच्या काळात होणारे विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि संघटनांचा पक्षपातीपणामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप होत आहे. तसेच परिक्षांबाबतीत खूप काही संभ्रम सुध्दा आहेत.
या कोरोना महामारीमूळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना एक आधार म्हणून विद्यार्थी वाचवा मोर्चा (V.V.M) ही संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहे तसेच जळगाव जिल्ह्यातही ह्या संघटनेची स्थापना करण्यात आलेली असून जळगाव जिल्हा प्रमुख पदी निलेश विलास नेरकर यांची निवड करण्यात आलेली असून सर्वत्र अभिनंदन होत आहे.