पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) : पहूर अभाविप शाखेतर्फे धुळे पोलीस प्रशासन व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
धुळे येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा पहूर शाखे तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आणि पहूर पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांना यांना निवेदन देण्यात आले. धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार व उच्च व अभियांत्रिकी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा देण्याची मागणी करून अभाविप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी जामनेर शहर मंत्री कल्पेश सोनवणे, जामनेर तालुका संपर्क प्रमुख गौरव तरवाडे, चेतन रोकडे, सचिन पाटील, अक्षय पाटील, गौरव गोयर, प्रवीण कुमावत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले.