विद्यार्थीवर अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी आंदोलन छेडणार

0

पारोळा – तहसील कार्यालयात मधील सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची जास्त पैसे घेऊन पिळवणूक  होत असून  त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवा नेते  रोहन सतीशराव पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार  यांना आज निवेदन देण्यात आले व विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी तहसीलदार साहेबांना खडे बोल सुनावले व यापुढे विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून विद्यार्थीची लुट थांबवावीं अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा  देण्यात आला. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते  रोहन पाटील तालुकाध्यक्ष बाळू पाटील युवक अध्यक्ष दिलीप पाटील शहराध्यक्ष संजय  बागडे आत्मा कमिटीचे अध्यक्ष राकेश पाटील  व असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.