जळगाव ;– उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे `कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव` असे नामकरण केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडयात विधानसभेत करुन काव्याद्वारे जीवनाचे व्यावहारीक तत्त्वज्ञान अधोरेखित करणाज्या श्रमसंस्कृतीचा व महिलांचा सन्मान केला असल्याची भावना व्यक्त करुन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने या घोषणेचे एकमुखाने स्वागत केले.
22 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाची घोषणा केली होती. या अनुषंगाने व्यवस्थापन परिषद सदस्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोमवार, दि.26 मार्च रोजी या नामांतरणाबाबत विचारविनिमय करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बौठक कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बौठकीत व्यवस्थापन परिषदेने मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत करुन याबाबत योग्य ती कार्यवाही करुन नामकरण सोहळा साजरा करण्याची संधी लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शासनाकडे केली.
प्रारंभी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी ही घोषणा सर्वांना आनंद देणारी आहे असे सांगून बहिणाबार्इंनी जीवनाचे तत्त्वज्ञान आणि सत्य आपल्या कवितेतून मांडले. खान्देशातील व्यक्तिमत्वाचा हा सन्मान असून साहित्यिकाचे नाव महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यापीठाला दिले जात आहे. त्यामुळे सर्व घटकांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. बहिणाबार्इंच्या जडण-घडणीचा अभ्यास विद्यार्थी करतील आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वात निश्चित फरक पडेल असे मत व्यक्त केले. विद्यापीठाने गेल्या 27 वर्षात केलेल्या प्रगतीचा कुलगुरुंनी यावेळी आढावा घेतला. दिलीप पाटील यांनी विद्यापीठाच्या दृष्टीने नामकरणाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून अशिक्षित महिलेने आपल्या कवितेतून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्यांचे नाव या विद्यापीठाला दिले जात असल्यामुळे वेगळे चौतन्य निर्माण होईल असे प्रतिपादन केले.
या बैठकीत तीन ठराव संमत करण्यात आले. दीपक पाटील यांनी मांडलेल्या ठरावात या नामकरणामुळे महिला वर्गाचा तसेच श्रमजिवी घटकांचा सन्मान होणार असून त्वरीत याबाबत कार्यवाही करुन नामकरण सोहळा साजरी करण्याची लवकर संधी शासनाने द्यावी असे या ठरावात म्हटले. त्याला प्रा.मोहन पावरा यांनी अनुमोदन देताना हे विद्यापीठ जनमनाचे ठाव घेणारे विद्यापीठ ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसरा अन्य ठराव दिलीप पाटील यांनी मांडला. त्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन करण्यात आले. या ठरावाला प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी यांनी अनुमोदन दिले. तिसरा ठराव डॉ. सुभाष चौधरी यांनी मांडला. या ठरावाला डॉ.एल.पी.देशमुख यांनी अनुमोदन दिले. या नामकरणासाठी पाठपुरावा करणारे आमदार एकनाथराव खडसे आणि सर्व लोकप्रतिधींचे व्यवस्थापन परिषदेच्या वतीने या ठरावाद्वारे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रा.एस.टी.इंगळे, प्रा.नितीन बारी, विद्यार्थी परिषद सभापती दिगंबर पवार, डॉ.बी.डी.कज्हाड यांनीही मनोगत व्यक्त करताना या निर्णयाचे स्वागत केले. या बौठकीचे सुत्रसंचालन कुलसचिव भ.भा.पाटील यांनी केले.