विद्यापीठा कडून विद्यार्थ्यांना दिलासा ; विकल्प अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची वाढ

0

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी आता पुन्हा दोन दिवस म्हणजे १९ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

विद्यापीठाने ‘एमकेसीएल’द्वारे विकसित DU Portal (विद्यापीठाच्या http://numj. digitaluniversity.ac या संकेतस्थळावर) विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा अकांउटमध्ये विकल्प पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात विद्यार्थ्यांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता विद्यापीठाने पुन्हा १९ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

विकल्प अर्ज भरून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://numj.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर जाऊन ई-सुविधा अकाउंटमध्ये Willingness to Appear in Exam या लिंकला क्लिक करून विकल्प सादर करायचा आहे. Willingness Form फक्त २०१९-२० मध्ये पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात प्रविष्ट असलेल्या किंवा अंतिम वर्ष उत्तीर्ण / अनुत्तीर्ण होऊन मागील सत्र/ वर्षातील असलेल्या विद्यार्थ्यांनी भरावयाचे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.