जळगाव प्रतिनिधी
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या 15 ऑक्टोबर पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनाअंतर्गत तीन दिवसीय अभिवाचन महोत्सवाला प्रारंभ होत आहे.
जळगाव शहरातील परिवर्तन ग्रुपचे कलावंत हा अभिवाचन महोत्सव करणार असून उद्या मंगळवारी दुपारी 3.30 वाजता अधिसभा सभागृहात अब्दुल बिस्मिल्लाह यांची दंतकथा, त्यानंतर बुधवारी भालचंद्र नेमाडे लिखित उंटमाज्या देशमुखाची कथा आणि गुरुवारी शंभू पाटील यांच्या गांधी नाकारायचाय चे अभिवाचन होणार आहे. विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेच्या वतीने हा चौथा अभिवाचन महोत्सव होत आहे अशी माहिती प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.अनिल डोंगरे यांनी दिली.
दरम्यान उद्या मंगळवारी विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त सकाळी 11 वाजता ज्ञानस्त्रेात केंद्रात चोपडा येथील प्रा.संदिप पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर राहणार असल्याची माहिती संचालक डॉ. अनिल चिकाटे यांनी दिली.