विद्यापीठातील ६ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखती

0

जळगाव  (प्रतिनिधी)  : –  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील ६ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखती अंतर्गत निवड झाली आहे.

विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारे  गद्रे मरीने एक्सपोर्ट प्रा.लि. रत्नागीरी व सचादे फुड प्रा.लि. अहमदाबाद ह्या कंपनीतर्फे बी.टेक. (फुड टेक्नॉलाजी)  च्या विद्यार्थ्यांची परिसर मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामधुन गद्रे मरीने एक्सपोर्ट प्रा.लि. रत्नागीरी ह्या  कपंनीमध्ये यात  अनुक्रमे ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये आदीत्य वानखेडे, रुतीका मराठे, मधुरा काळे, धिरज देशमुख, राधा माळी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच सचादे फुड प्रा.लि. अहमदाबाद या कंपनीत हर्षल पवार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी,प्र-कुलगुरु एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा.अजयगिरी गोस्वामी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.या परिसर मुलाखतीसाठी युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख प्रा.विशाल पराते, डॉ. भुषण चौधरी, डॉ. प्रशांत मांडे तसेच युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (केमीकल इंजिनिअरींग) विभागाचे प्रमुख व केंद्रीय प्रशिक्षण नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार,उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर श्रीमती सोनाली दायमा यांनी व्यवस्थापन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.