जळगाव (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटना त्यांच्या विविध मागण्यांसाठी 21 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सह ठिय्या आंदोलन करणार आहे. मागण्या सोडवाव्या याकरिता शुक्रवारी 18 रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाच्या वित्त विभागाच्या दोन निर्णयातील सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या तरतुदी लागू केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे रद्द केलेले शासन निर्णय पूर्वलक्षी पूर्वप्रभावाने पुनर्जीवित करावेत. आकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग सर्व लाभासह लागू झाला पाहिजे. या दोन मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी 21 सप्टेंबर पासून लेखणी, अवजार बंदसह ठिय्या आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. उदय सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वसन दिले आहे.