जळगाव;- रावेर तालुक्यातील मौजे मोरगांव बु येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि तीन ग्रा. प. सदस्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ९ एप्रिल पासून जिल्हा परिषदेसमोर उपसरपंच किरण हरिसिंग ढिवरे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे . याबाबतचे निवेदन त्यांनी सीईओ दिवेकर यांना दिले आहे .
याबाबत माहिती अशी कि , मोरगाव बु . येथील ग्रामपंचायतीने गावठाण जागेवरील अतिक्रमण काढण्यात येऊ नये असा ठराव ग्रामपंचायतने बहुमताने मंजूर केला आहे . परंतु हा ठराव विखंडित करण्याबद्दल ग्रा.प.ने २६ फेब्रुवारी २०१७ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत मासिक सभेत विखंडित करण्याचा ठराव संमंत केलेला नाही . तरी ग्रा.प. ठराव ४ (१) नुसार अतिक्रमण निष्कासित करण्यात येऊ नये असा ठराव ४ विरुद्ध ३ असा असल्याने सरपंच अलका पाटील,सदस्य भास्कर गंभीर पाटील,रवींद्र नामदेव पाटील,छाया विनायक पाटील यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने ती करण्यात यावी या मागणीसाठी उपसरपंच किरण हरिसिंग ढिवरे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.