नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नांदेड, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे काही घरांना तडे गेले आहेत. ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
पैनगंगा नदीच्या अलिकडील भागात हे धक्के जाणवले आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. यामुळे
सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. टीव्ही पाहणाºया, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या.
चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.