Sunday, January 29, 2023

विटभट्टीधारकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

- Advertisement -

फैजपूर ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

फैजपूर येथील विटभट्टीजवळ अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून विटभट्टीधारकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीसात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील  भुसावळ रोडवर जगनाडे नगरात आकाश संतोष कापडे (वय २४, रा. दक्षिण बाहेर पेठ फैजपूर ता. यावल) यांची विटभट्टी आहे.  रविवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.२० वाजेच्या सुमारास अज्ञात दोन जण दुचाकीने विटभट्टीजवळ आले. त्यांनी विटा घेण्याच्या उद्देशाने विटभट्टीधारक आकाश कापडे यांच्याशी बोलत असतांना एकाने दुचाकीवरून एक लोखंडी आणि एक प्लास्टीक रॉड काढून, “तु आमचे मित्राच्या नांदी का लागतो” असे सांगून एकाने आकाश डोक्यात प्लास्टीक रॉड टाकला तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने पायावर व हातावर मारून जखमी केले व दोघे पसार झाले.

- Advertisement -

याप्रकरणी आकाश कापडे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे