चोपडा प्रतिनिधी |
तालुक्यातील विटनेर येथे दोन सख्या बहिणी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना त्यांचा दि २७ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मजुरी काम करणाऱ्या कविता राजाराम बारेला(२२) रा अनवर्दे ता चोपडा व दिपाली प्रकाश बारेला(१४) रा विटनेर ता चोपडा या दोघी सख्या बहिणी व त्याच्या सोबत लहान भाऊ विक्की हे दि २७ रोजी सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तापी नदी पात्राच्या डोहाजवळ कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.नदी पात्रात कपडे धुत असतांना कविता बारेला हिचा पाय घसरल्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तिचा तोल गेला तेव्हा तिने लहान बहीण दीपाली बारेला हिचा हात धरला असता त्या दोघे बहिणी पाण्याच्या खोल डोहात पडल्याने त्याना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्याच्या डोहात बुडून मयत झाला आहे. कविता बारेला ही अनवर्दे येथील माहेरी तीन दिवसांपूर्वीच अक्षय तृतीयासाठी विटनेर येथे आली होती. तिला अकरा महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे या घटनेबाबत परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.विटनेर येथील पोलीस पाटील छोटू पाटील यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास पो हे कॉ सुनील जाधव करीत आहे.