बोदवड | प्रतिनिधी

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे दि.३० मार्च २०२१ रोजी भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना प्रायोजित Science and Technology for Sustainable Development with Women Empowerment या विषयावर राष्ट्रीय ई-परिषद नुकतीच संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विज्ञान व तंत्रज्ञानाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटनेतील अमरावती चाप्टर विभागाचे संयोजक डॉ.महेश चिखले , फरिदाबाद्च्या महिला महाविद्यालायाच्या प्राध्यापिका डॉ.बिना सेठी,जळगाव येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्राचार्या डॉ.गौरी राणे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.डी.एस.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर ई-परिषद नुकतीच संपन्न झाली.सदर राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल,सचिव विकास कोटेचा आणि सर्व पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले. उद्घाटनपर भाषणात डॉ.आर. एस.पाटील यांनी ‘महिलांचे संशोधनातील योगदान’ याविषयी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटनेतील अमरावती चाप्टर विभागाचे संयोजक डॉ. महेश चिखले यांच्यातर्फे इंडीयन सायन्स कॉंग्रेसद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रमविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ई-परिषद दोन सत्रामध्ये घेण्यात आली.उद्घाटनानंतर लगेच प्रमुख वक्त्या डॉ.बिना सेठी यांनी ‘आजच्या विज्ञान युगात महिला सबलीकरणाची गरज ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रातील प्रमुख वक्त्या डॉ.गौरी राणे यांनी समाजात महिलाशिक्षणाचे फायदे विशद केले.तसेच अद्ययावत संशोधनाबद्दल माहिती दिली, मार्गदर्शन केले.कोरोनाशी संबंधित आजारावर मार्गदर्शन केले.यावेळी देशातील विविध राज्यांतून विविध मान्यवर ,विविध संशोधक,विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.सदर राष्ट्रीय परिषदेचा समारोपाशेवटी प्रश्नोत्तराचे सत्रही घेण्यात आले.
परिषदेचे प्रास्ताविक प्रमुख संयोजक डॉ.गीता पाटील यांनी केले.आभार परिषदेचे सदस्य डॉ. चेतनकुमार शर्मा यांनी मानले व सूत्रसंचालन श्री.नरेंद्र जोशी यांनी केले.परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.रुपाली तायडे,डॉ.रुपेश मोरे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.

