पाचोरा – प्रत्येक गाव प्रत्येक घर आणि प्रत्येक सदस्य” यांना हक्काचं आरोग्य सुरक्षा कवच मिळाव या संकल्पनेतुन डाॅ. भुषण मगर यांनी सर्व उपचारांचे माहेरघर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल मार्फत महा – आरोग्य नोंदणी अभियानाला आजपासुन सुरूवात केली आहे.
अस्मिता फाऊंडेशन तर्फे नांद्रा ता. पाचोरा येथे आयोजित बचत गट महिला मेळाव्यात या कार्डचे वितरण डाॅ. अस्मिता पाटील, डाॅ. सुवर्णा पाटील सह सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. पहिला टप्यात कार्डचे कुरंगी – बांबरुड जि.प गटामधील संपुर्ण घराघरापर्यंत हे आरोग्य सवलत आणि माहिती कार्ड वितरीत झाल्यानंतर पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील इतर गावागावात आणि प्रभागात हे कार्ड आणि माहिती जनजागृती शिबीर पोहचवण्यात येणार आहे. यावेळी डाॅ. भुषण मगर, डाॅ. अस्मिता पाटील, डाॅ. सुवर्णाताई पाटील, ज्ञानवर्धिनी फाऊंडेशन अमळनेरचे जीवन मोरे आणि सर्व पंचक्रोशीतील महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.