विक्रमी धडक.. सोनं ५० हजाराच्या पार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बदलणाऱ्या  जागतिक घडामोडी व अर्थकारणाच्या आधारावर सोन्याचे भाव तेजीत आले आहेत. तब्बल एक वर्ष गुंतवणूकदार व ग्राहकांना दरातील मंदीचा लाभ देत असताना आता सोन्याचे दर मात्र आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

सोने- चांदी बाजारपेठेत कालपासून आणि आज सोन्याच्या भावाने दीर्घ कालावधीनंतर 50 हजार रुपयांवर प्रतितोळा अशा विक्रमी भावाची धडक मारली आहे.

मागील काही दिवसांपासून सातत्याने सोन्याचे भाव वाढणार, असे सांगितले जात होते. तरीही दिवाळीपर्यंत कमी भावाचा लाभ ग्राहक व गुंतवणूकदारांना झाला. कोरोनाची विस्कळित बाजारपेठ व जागतिक अर्थकारणामुळे सोन्याचे भाव मंदीत होते. तब्बल एक वर्षापासून सोन्याचे भाव कमी झालेले होते. पण कोरोनाकाळात ग्राहकी देखील कमी झालेली होती. केवळ या स्थितीचा लाभ गुंतवणूकदारांनी अधिक प्रमाणात घेतला. कोरोनाची लाट ओसरून नंतर दिवाळीत ग्राहकांनी या मंदीच्या स्थितीचा लाभ घेतला.

येत्या लग्नसराईत सोन्याच्या मागणीत वाढ होणार हे निश्‍चित होते.  आता सोने-चांदी बाजारात सोन्याचे भाव 50 हजार रुपयांवर पोहचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.