विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला जनता व कार्यकर्त्यांची भक्कम साथ ! – गुलाबराव पाटील

0
जनतेच्या प्रेमाने भारावलो- विकासातून ऋण फेडण्याचा प्रयत्न
जळगाव / धरणगाव – विकास कामांच्या माध्यमातुन जळगाव व धरणगाव तालुक्यात जनतेला 5 वर्षात दिलेल्या सेवेची पावती मोठ्या मताधिक्याने विजयी करुन मिळाली असुन जनता व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या भक्कम एकजुटीमुळे शिवसेनेचा भगवा जळगाव ग्रामीणवर पुन्हा फडकला आहे, जनतेचे हे आशीर्वाद मी नम्रपणे स्विकारत असुन त्यांच्या प्रेमाने मी भारावलो असून यापुढेही विकासाचा झंझावात सुरुच राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री, उपनेते व जळगाव ग्रामीणमधुन पुन्हा विजयी झालेले आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
 सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ही निवडणुक धनशक्ती व भाजपच्या काही फितुरांविरुध्द होती. मात्र, हिंदुत्वाच्या विचाराशी बांधलेले भाजपचे अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत होते. शिवसैनिकांनी रात्र-दिवस घेतलेली मेहनत व जनतेने दिलेल्या पाठबळामुळे हा विजय मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.