विकासकामांना विरोध दर्शविण्याची वाघ कुटुंबियांची परंपरा खानदानीच

0

 – आमदार किशोर पाटील

– मा.आ. दिलीप वाघांच्या पत्रकार परिषदेला दिले उत्तर

 पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा मतदारसंघात सत्ताधारी आमदार कामे करत असेल तर त्याला विरोध करण्याची वाघ कुटुंबियात परंपरा ही खानदानीच असून हा विषयी मतदारसंघातील जनतेला ज्ञात आहे. माजी मंत्री कै. के.एम.बापू पाटील हे जेव्हा सत्तेवर येऊन बहुळा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तेव्हा यांनी सिंघाडे मोर्चे काढून या प्रकल्पाला विरोध दर्शवीला. मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यांनीच उद्घाटन केले. हे ही जनतेला ज्ञात असून सध्या जनतेत जाऊन सांगण्यासारखे काही शिल्लक न राहिल्याने दिलीप वाघ हे पत्रकार परिषदेत विकासकामांना विरोध करून वृत्त पत्राच्या माध्यमातुन जनतेसमोर जाण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी दि. १७ रोजी वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना सांगितले. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हापरिषद सदस्य पदमसिंह पाटील, उद्योजक मुकुंद बिलदीकर, सेनेचे जिल्हाउपप्रमुख गणेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती एड. दिनकर देवरे उपस्थित होते.

शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी दिलीप वाघांनी औद्योगिक वसाहतीची मंजुरीही विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणलेला फंडा असून शेतकरी व बेरोजगारांची दिशाभूल करणारा आहे. या शिवाय उतावळी, बहुळाच्या पाण्याचे आणि क्रीडा संकुलनाचे काय झाले ? असे प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना आमदार पाटलांनी सांगितले की क्रीडासंकुलनाचा प्रश्न हा त्यांच्याच काळातील असून क्रीडासंकुलाची जागा त्यांनी शिक्षण संस्थेच्या नावावर हडपण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. जामनेर पासून पाचोऱ्याचा भाग उंचावर असल्याने ते पाणी आणणे शक्य नाही. उतावळी चे पाणी बाहुळात सोडण्यासाठी डी. पी.टी. सी च्या बैठकीत ३० कोटी पैकी १८ कोटी मंजूर करण्यात आले आहे. उतावळी ऐवजी थेट गिरनेतून पाईपलाईन द्वारे पाचोरा भडगाव साठी पाणी आण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दिलीप वाघ हे सत्तेतील आमदार असताना त्यांचे सहकार्य राजीव देशमुख यांनी गिरनेतून पाण्याची व्यवस्था आणली. मात्र यांना तेव्हा का सुचले नाही.

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी २६/०१/२०१९ रोजी लोकशाही महोत्सवाचे आयोजन करून वाघ व मला आमनेसामने बोलविले होते. त्या वेळी दिलीप वाघांनी एम.आय.डी. सी चया मंजुरी बाबत प्रश्न विचारला होता. मी त्याच वेळी सहा महिन्यात एम.आय.डी. सी आणतो असे सांगितले होते. त्या प्रमाणेच एम.आय.डी. सी ची मंजुरीची आदेशासाठी १९/१०/२०१८ च्या मंत्रालयाच्या बैठकीत (एच.पी.सी) हायमायर कमिटी ची बैठक होऊन भडगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीच्या आदेश देऊन राज्य शासनांच्या राजपत्रात मंजुरीच्या घोषणेच्या आदेश जिल्हा अधिकारी कार्यलयात प्राप्त होऊन भूसंपादन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांची नियुक्ति ही करण्यात आली आहे. राज्य शासनांच्या पत्रात सुतगीरणीची ११९.१२ एकर व खासगी क्षेत्राची ७८.७३ हेकटर जागा मिळाली असून याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी होकार दिला आहे. जमीन भूसंपादन नंतर रस्ते, पाणी, गटारी, वीज ही कामे होऊन औद्योगिक वसाहतीच्या कामासाठी २ वर्षाचा कालावधी लागणार आहे. मला नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने मी ८०० कोटींची विकास कामे केल्याचे ठासून सांगत आहे. मात्र वाघांनी ५ वर्ष आमदारकी भोगून मतदारसंघाला २५ वर्ष मागे नेल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.