वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0

चाळीसगाव :- तालुक्यातील टाकळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ३६ वर्षीय दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चेतन सुधाकर बागुल असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातील नेताजी चौक येथे राहणारे चेतन बागुल हे तालुक्यातील टाकळी येथील अश्वमेध इंग्लिश स्कूल मध्ये क्लार्क म्हणून नोकरीस आहेत. दुपारी ते शाळेच्या कामानिमित्त टाकळी येथील बँकेत गेले होते. बँकेतील काम आटपून शाळेकडे येत असताना मालेगाव रस्त्यावर ्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर मार लागल्याने जखमी झाले.त्यांना चाळीसगाव येथे प्राथमिक उपचार करून त पुढील उपचारासाठी हलवत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई-वडील पत्नी व एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे .अपघात झाल्यानंतर धडक देणारे वाहन चालक अपघाताची माहिती पोलिसांना न देता जखमींना सोडून पसार झाला विनोद भिकन पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.