वासरे फाट्यावर उलटले पाण्याचे टँकर

0

 पाडळसरे | प्रतिनिधी  

वासरे गावासाठी पहिल्याच दिवशी मंजूर झालेले पाण्याचे टँकर कळमसरे गावाजवळच उलटल्याची घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, या अपघातात सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही.
येथून जवळच असलेल्या वासरे, खेडी, खरदे या सध्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. तर गेल्या आठवड्यापासून वासरे ग्रामपंचायतीने अतिरिक्त टँकरची मागणी केली होती. ती मागणी मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी पहिलेच पाण्याचे टँकर एकलहरे येथून वासरे येथे रवाना झाले. मात्र, टँकरचालक नवीन असल्याने तो वासरे मार्गे न जाता शहापूर- कळमसरे रस्त्याने मार्गस्थ झाला. कळमसरे-पासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील वासरे फाट्याजवळ वळण न बसल्याने हे टँकर (एमएच- १८ एम -४१००) नाल्यात जाऊन उलटले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वासरे येथील माजी सरपंच प्रवीण पाटील, खरद्याचे संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चालक सुकलाल पाटील यांना मदत केली. तर चालक केवळ रस्ता चुकल्याने हि घटना घडली. तर पाण्याने भरलेला टँकर उलटल्यावर हजारो लिटर पाणी वाया गेले, त्यामुळे वासरे करांना अतिरिक्त मिळालेल्या पाण्यापासून शुक्रवारी वंचित राहावे लागले आहे. या घटनेमुळे कळमसरे शहापूर-मार्गे जाणारी शिरपूर-अमळनेर बससेवा वासरे मार्गे वळवण्यात आली होती. तर खासगीत वाहनांना येथून जाताना कसरत करावी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.