अमळनेर– तालुक्यातील वासरे येथे 6 लाख रुपयांचा गावदरवाजा व दलित वस्ती काँक्रीटीकरण तर खेडी बु येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत 10 लाख रुपयांच्या निधीत अशा 20 लाखांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
तालुक्यातील वासरे येथे येथील गावदरवाजा 6 लाख रुपयांचा निधीत व दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण 4 लाख रुपयांच्या निधीत होत असून याचे आयोजन वासरे खेडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केले होते. यावेळी सरपंच आशा पाटील, उपसरपंच गोकुळ पाटील, सदस्या कमलबाई पाटील, सुमनबाई पाटील, ऊज्वला पाटील, शामकोरबाई भिल, बापु पाटील, अंकुश गव्हाणे, गोकुळ भिल व वासरे येथील दिपक पाटील, भटू पाटील, मधुकर पाटील, रोहिदास पाटील, मनोहर पाटील, प्रकाश पाटील, हिलाल पाटील, राजेंद्र पाटील, समाधान पाटील, गुलाब पाटील, खर्दे येथील सर्जेराव पाटील, नरेंद्र पाटील, शिवाजी पाटील उपस्थित होते.
त्यानंतर जवळच असलेल्या खेडी बु येथे जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत ( 10 लक्ष ) या कामाचे देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी सरपंच आशा पाटील, उपसरपंच गोकुळ पाटील, सदस्या कमलबाई पाटील सुमनबाई पाटील, ऊज्वला पाटील, शामकोरबाई भिल, बापु पाटील, अंकुश गव्हाणे, गोकुळ भिल व ग्रामस्थ खेडी बु तसेच ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण पाटील, बाळू पाटील, विश्वास पाटील, भगवान पाटील, रोहिदास पाटील, किशोर पाटील, दिलीप मिस्त्री, विजय पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, भोलेनाथ कोळी, उमेश पाटील, पंडित पाटील, वासरे येथील दिपक पाटील, भटू पाटील, मधुकर पाटील, रोहिदास पाटील, गुलाब पाटील व कन्हैय्यालाल पाटील, खर्दे येथील सर्जेराव पाटील शिवाजी पाटील उपस्थित होते.