वाळू ट्रॅक्टरची अ‍ॅपेरिक्षाला धडक ; 2 ठार एक जखमी

0

यावल, दि. 21 –
यावल तालुक्यातील आडगाव रस्त्यावर दि. 21 गुरूवारी रोजी सकाळी 6.45 वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगाने अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने अ‍ॅपेरिक्षाला धडक दिली. यामध्ये दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवून दिला.
गुरुवारी सकाळी इयत्ता नववीचे विद्यार्थी शाळेत जात होते. मनुदेवीकडे जाणार्‍या आडगाव फाट्याजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने अ‍ॅपेरिक्षाला दिलेल्या धडकेत दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी जखमी झाला. घटना घडताच परिसरातील नागरिक धावून आले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅक्टरला आग लावली. चौफुलीवर मोठा जमाव जमल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, यावेळी एका पोलिसाला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या अपघातामध्ये मृत झालेल्यांमध्ये दिपक अरुण पाटील (14) राहणार कासारखेडा, राका जहांगीर तडवी (14) राहणार आडगाव, हे दोघेही विद्यार्थी अवैद्य वाळू वाहतुकीचे बळी ठरल्याने अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे वास्तव समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.