जळगाव । पोलीस मुख्यालयातील शहर वाहतूक शखेच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन्ही कर्मचारी व निरीक्षकांना भोवले आहे. विनोद संतोष चौधरी व रवींद्र विठ्ठल जाधव या दोन्ही वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. शनिवारी या बाबतचे आदेश डॉ. उगले यांनी काढले.
याबाबत सविस्तर असे की, ममुराबाद रस्त्यावर वास्तव्याला असलेल्या वाळूमाफियाचा गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनाता साजरा करण्यात आला. वाळू माफीयाचा वाढदिवस साजरा झाल्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल होते. दरम्यान या बाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिध्द करताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधिक्षकांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपअधीक्षक ( गृह) केशव पातोंड यांचेकडे देण्यात आली होती.
दरम्यान छायाचीत्रातील पोलीस कर्मचार्याची आणि त्या वाळू व्यावसायीकाची अवैध वाळू व्यवसायात भागिदारी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दरम्यान या प्रकरणाचा चौकशी अहवाल पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी पोलीस अधीक्षकांकडे सादर केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणातील पोलीस कर्मचारी विनोद चौधरी आणि रविंद्र जाधव यांच्या निलंबनाचे आदेश शनिवारी जारी केले.