जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू माफियांनी अक्षरश हैदोस माजवला आहे. तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळू उपसा करून शेतातून ट्रक्टर जाण्यास रोखणाऱ्या शेतकऱ्याला वाळूमाफियांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली.
याप्रसंगी वेळीच ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ट्रक्टर चालकांनी नदीपात्रात ट्रॅक्टर सोडून पसार झाले आहे. या मारहाणीत मनोहर चौधरी रा. आव्हाणे ता.जि. जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्राच्या काठावर शेत आहे. वाळू माफिया हे गिरणा नदीतून वाळूचा उपसा करून त्यांच्या शेतातून ट्रक्टर व डंपर नेत होते. यामुळे त्यांच्या शेतात रस्ता तयार झाला होता. याबाबत शेतकरी मनोहर चौधरी यांनी शेतातून वाहनांना जाण्यास मनाई केली. याबाबत शेतकरी आणि वाळूमाफिया यांच्या वाद झाला. यात शेतकऱ्याला वाळूमाफीयांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते बेशुध्द झाले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर नातेवाईकांसह आव्हाणे गावातील नागरीकांनी धाव घेतली. नागरीकांना पाहून वाळूमाफियांनी ट्रक्टर सोडून पसार झाले होते.
याप्रकरणी जळगाव तहसीलदारांना माहिती देण्यात आली असून तहसीलदार व पोलीस प्रशासन नदीपत्रात झाले असून पुढील कारवाईचे काम सुरू आहे.