Tuesday, September 27, 2022

वाळूची अवैध वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चोपडा तालुक्यातील मंगरूळ फाटा परिसरात विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असून दोन जणांविरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

चोपडा तालुक्यातील  अडावद चोपडा रोडवरील मंगरूळ फाटा चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गोसावी यांना मिळाली. त्यानुसार गोसावी यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता कारवाई करत दोन ट्रॅक्टरला अडविले. (एमएच 19 सीव्ही 9434 आणि एमएच 19 सीझेड 2615) या दोन ट्रॅक्टरवरील चालक सदाशिव बाबुराव भिल रा.खेडी भोकर आणि मनोज दिनकर ठाकरे रा. वटार ता. चोपडा या दोघांविरोधात अडावद पोलीस ठाण्यात योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नसीर तडवी करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या