सावदे येथे ठरावास ग्रामस्थांचा विरोध
भडगाव — सन २०२०, २०२१ साठी गिरणा नदीपाञातील वाळु लिलाव ठराव करण्यासाठी भडगाव नगरपरीषद व भडगाव तालुक्यातील वाक, सावदे, या गावांना ग्रामपंचायतींमध्ये नुकत्याच ग्रामसभा घेण्यात आल्या. सावदे येथे वाळु लिलाव ठरावास ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शविला. त्यामुळे ठरावास नकार मिळाला आहे. तर भडगाव , टोणगाव, वडधे, वाक या ३ ठिकाणी वाळु लिलावासाठी ठरावास मंजुरी मिळाली आहे. या ग्रामसभांच्या अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा भडगाव नगर परीषदेचे प्रशासक राजेंद्र कचरे हे होते. या सभांना भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे, मंडळ अधिकारी आर. पी. तायडे, टोणगाव तलाठी राहुल पवार, वाकचे तलाठी विलास शिंदे,वाक ग्रामपंचायतीचे प्रशासक डी. ए. चिंचोरे , ग्रामस्थ उपस्थित होते. भडगाव टोणगाव, वडधे, वाक ३ गावांचे वाळु ठरावासह प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकङे पाठविण्यात आलेले आहेत. अशी माहिती भडगाव तहसिल प्रशासना मार्फत देण्यात आली.
याबाबत माहीती अशी कि, भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदी प्रवाहीत आहे. भडगाव शहरासह तालुक्यातुन काही गावांना गिरणा नदीच्या पाञातुन बिनधास्तपणे वाळुचा अवैध उपसा सुरुच आहे. महसुल प्रशासनाकडून अवैध वाळु चोरी करणार्यांवर कार्यवाहयाही होतांना दिसत आहेत. वाळुतुन महसुल प्रशासनाला महसुल मिळावा. म्हणुन सन २०२०, २०२१ साठी भडगाव , वाक, वडधे, सावदे या गावांच्या हद्दीतील गिरणा नदीच्या पाञातील वाळुचा लिलाव करण्यासाठी ठराव मंजुरीसाठी हया ग्रामसभा घेण्यात आल्या. पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा नगर परीषदेचे प्रशासक राजेंद्र कचरे, भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे यांनी ग्रामसभांमध्ये भडगाव , वाक, सावदे येथे झालेल्या ग्रामसभेत गिरणा नदीच्या वाळु लिलावाबाबत ठरावाला ग्रामस्थांनी मंजुरी दयावी असे प्रशासना मार्फत आव्हान केले. या लिलावातुन गावाच्या विकासासाठी निधीही मिळणार आहे. याबाबत चर्चा विनीमय करण्यात आली.
सावदे येथे ठरावास ग्रामस्थांचा जोरदार विरोध —
भडगाव तालुक्यातील सावदे येथेही याबाबत महसुल प्रशासना मार्फत गावातील मंदीराजवळ ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे होते. वाळुच्या लिलावासाठी ठराव मंजुर करावा. गावाच्या विकासासाठी निधी मिळेल. असे आव्हान प्रशासनाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांना सुरुवातीस केले.माञ सावदे येथे माञ ग्रामस्थांनी वाळु लिलावासाठी ठराव मंजुर केला जाणार नाही. ग्रामस्थांना याचे चटके सहन करावे लागत आहेत. ग्रामस्थांनी ग्रामसभेत जोरदार विरोध दर्शविला. त्यामुळे सावदे येथील वाळु लिलावासाठी ठरावास नकार मिळाला आहे. या सभेस भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे, प्रशासक बी. बी. बोरसे, ग्रामसेवक जीवराम पाटील, मंडळ अधिकारी बागड, तलाठी एस आर बोडे, पोलीस पाटील छायाबाई पाटील, शिवाजी पाटील, माजी उपसरपंच सुनिता राजपुत, सुनिल राजपुत, संभाजी पाटील, भावसिंग परदेशी, सुभाष परदेशी, संभाजी पाटील, दिनेश परदेशी, अंबरसिंग परदेशी यांचेसह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
वाक येथेही झाली ग्रामसभा. ठराव मंजुर —
भडगाव तालुक्यातील वाक येथेही वाळु लिलावासाठी ठरावासाठी श्री. दत्त मंदीराजवळ ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे होते. पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी वाळु लिलाव करणे बाबत शासनाचे धोरणात्मक विचार व वाळु लिलाव बाबतचे महत्व पटवुन सांगीतले. वाळु लिलावासाठी ठरावाला मंजुरी दयावी असे ग्रामस्थांना आव्हान केले.ग्रामसभेत ग्रामस्थांनी याला काही प्रमाणात विरोध दर्शविला. ग्रामस्थांनी आपले मते मांडलेत. चर्चा विनीमय करण्यात आली. वाक येथील ठरावास ग्रामस्थांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी भडगावचे तहसिलदार माधुरी आंधळे, वाक ग्रामपंचायतीचे प्रशासक डी.ए. चिंचोरे, मंडळ अधिकारी आर. टी. तायडे, वाकचे तलाठी विलास पाटील, ग्रामसेवक विकास पाटील, पोलीस पाटील उमेश शिरसाठ, कैलास पाटील, नरहर पाटील, बाळकृष्ण पाटील, स्वप्नील पाटील, कुणाल पाटील, जे. के. पाटील, डीगांबर पाटील, नगराज पाटील, प्रकाश पाटील, प्रविण पाटील, सुरेश पाटील, जगदीश पाटील, जयवंत पाटील यांचेसह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. वाक हद्दीतील गिरणा नदी पाञातील गट नं. ६९, ७०, ७१ मधुन १ हेक्टर ५ आर पर्यंत वाळु लिलाव करण्यास ठराव मंजुर करण्यात आला आहे. अशी माहिती महसुल प्रशासना मार्फत देण्यात आली.
वडधे व टोणगाव भडगाव या दोन्ही गावांना ठरावास मंजुरी —
भडगाव शहरातील टोणगाव व वडधे गिरणा नदी पाञातील वाळु लिलाव करणेबाबत ठराव मंजुरीसाठी भडगाव नगर परीषद कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. ही सभा पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. टोणगाव भडगाव व वडधे या दोन्ही गावांना ग्रामसभेत वाळु लिलाव ठरावास मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवातीस पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना टोणगाव व वडधे येथील हद्दीतील गिरणा नदीच्या पाञातील वाळु लिलावाबाबत सकारात्मक बाजु मांङुन प्रशासनाची भुमिका मांडली. शासकीय कामांना वाळु लागते.व सार्वजनिक वाळु चोरीला आळा घातला जाईल.शहरी व ग्रामीण भागाला विकास कामांना, घरकुल बांधकामांना वाळु मिळेल.तसेच या सभेस उपस्थित लोकप्रतिनिधी , ग्रामस्थ यांचे सोबतही राजेंद्र कचरे यांनी चर्चा केली.सकारात्मक बाजु मांडली. या सभेस भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, मंडळ अधिकारी आर. टी .तायडे, टोणगाव तलाठी राहुल पवार, वडधे तलाठी विलास पाटील, जगन भोई, संतोष महाजन, लखीचंद पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.वाळु गटाच्या लिलावा संदर्भात विचार विनीमय करण्यासाठी माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष , माजी नगर सेवकांना दुरध्वनी करण्यात आले होते. माञ या ग्रामसभेस नगर परीषदेचे आजी माजी पदाधिकार्यांची अनुपस्थिती दिसुन आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपआपले मते मांङत सविस्तर चर्चा केली. वाळु लिलाव ठरावास टोणगाव व वङधे गिरणा पाञ हद्दीसाठी मंजुरी देण्यात आली. या दोन्ही ठरावास ग्रामसभेत ग्रामस्थांनी होकार दर्शविला. हया ग्रामसभा इनकॅमेरा घेण्यात आल्या. गिरणा नदी पाञातील टोणगाव हद्दीतील गट नं. १४६, १४७ व वडधे हद्दीतील गट नं. १४, १५, १६, १७ करीता वाळु लिलाव करणेकामी ठराव ग्रामसभेत मंजुर करण्यात आला.
भडगाव तालुक्यात गिरणा नदीच्या पाञातील वाळुचा लिलाव होणेकामी शासनाचे आदेशानुसार सावदे, वाक, वडधे, टोणगाव आदि ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. यात सावदे येथील ठरावास ग्रामस्थाचा ग्रामसभेत नकार मिळाला आहे. तर वाक, वडधे, टोणगाव या ३ ठिकाणचे वाळु लिलावासाठी ठरावास ग्रामस्थांनी ग्रामसभेत होकार देत ठरावास मंजुरी दिली आहे. हे तिन्ही गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठविलेले आहेत.
राजेंद्र कचरे. उपविभागीय अधिकारी. पाचोरा.

