वाळु माफीयांची दबंगगिरी; तलाठ्याला धक्का-बुक्की

0

जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या माफीयांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच असुन आज दि.४ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पळासखेडे मिराचे येथे आलेल्या वाळुच्या डंपरला थांबविण्यास गेलेल्या तलाठी मोहन महाजन यांना डंपर चालकाकडून धक्का-बुक्की करण्यात आली.

म्हसावदकडुन येणारे वाळुने भरलेले डंपर नंबर एमएच १९ शी वाय ५२७२ हे तालुक्यातील पळासखेडा मिराचेकडे येत असतांना पळसखेडा मिराचे येथील सजाचे तलाठी मोहन महाजन,कोतवाल जगन कुंभार यांनी डंपरचा पाठलाग करून तपासणीकामी थांबविण्याचा प्रयत्न केला असता .चालक भरधाव वेगाने पुढे गेला,त्या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर गावालगतच डंपर रोखण्यात आले.तेवढ्यात तलाठी-चालकामधे तुतू-मैमै होऊन तलाठ्यास चक्क जबर धक्का-बुक्की करण्यात आली.

यावेळीकोतवाल जगन कुंभार यांनाही ढकलून देण्यात आले.या घटनेचा पंचनामा पळसखेडा मीराचे येथील पोलीस पाटील प्रकाश बिचारे व कोतवाल जगन कुंभार ह्या पंचान समक्ष करण्यात आला असुन, तलाठी मोहन प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसठाण्यामधे रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.