वार्षिक स्नेहसंमेलन

0

शिदाड ता पाचोरा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर तारखेडा बु. ता.पाचोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.तब्बल महिना भरापासून शिक्षक व विद्यार्थी यांनी घेतलेल्या परिश्रमातून नृत्य, गायन व अभिनयाचा सुंदर आविष्कार स्नेहसंमेलनात झाला आणि शाळेच्या बालकलाकारांनी गावातील उपस्थितांना तीन तास जागेवरच खिळवून ठेवले.”शाळेला गावाचा आधार व गावाला शाळेचा अभिमान” यानुसार गावकऱ्यांनी सुद्धा बक्षिसांच्या स्वरूपात बालकलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला…!!

 

“लेक वाचवा,देश वाचवा” या सामाजिक विषयावरील नाटिकेच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तात्यासो श्री विकास पाटील साहेब यांनी जिल्हा परिषद शाळांमधील होणारा सकारात्मक बदल अधोरेखित केला…!!

 

शेवटी, “कार्यक्रम संपला आहे असे सांगावे लागले आणि सहजच सर्वांच्या तोंडून शब्द निघाले, “असा कार्यक्रम आजवर झाला नाही”…!!

कार्यक्रमासाठी श्रीमती दीपा बोडखे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन सौ. ज्योती शशिकांत महालपुरे मॅडम यांनी केले. श्री दिनेश लांडगे सर तसेच श्री किशोर इंगळे यांचेही सहकार्य लाभले…!!

 

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक श्री मुरलीधर मोराणकार, सौ कल्पनाताई अरुण पाटील व श्री अरुण पाटील,ग.शि.अ. तात्यासो श्री विकास पाटील,केंद्रप्रमुख सारोळा श्री विजय धनराळे,आबासो श्री विकास पाटील,हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एन.वाय. पाटील सर, शा. व्य. समिती अध्यक्ष श्री मनोज पाटील व सर्व सदस्य, श्री भिका बाविस्कर गुरुजी,श्री वसंत वाघ गुरुजी, केंद्राअंतर्गत शिक्षकवृंद तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.