वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

0
जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील श्री स्वामी समर्थ पुर्व प्राथमिक शाळेत वार्षिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थापक तथा ग स सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील सर प्रमुख अतिथी जिल्हा सरचिटनीस भाजपा नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील,पत्रकार नंदलाला पाटील ,स्वामी समर्थ ग्रुप संचालिका कु प्रतिक्षा पाटील मँड्म कल्पनाताई पाटील ,युवराज पाटील,इग्लिश मेडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती मँड्म व प्रविण पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली .
लहान चिमुकल्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. शाळेत संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सहभाग घेऊन विविध खेळ चित्रकला स्पर्धा डान्स ,स्पर्धा फॅन्सी ड्रेस, रनिंग स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या कला दाखविल्या अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.देशभक्तीपर डान्स सादर करण्यात आले व यासाठी सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी केले.  व आभार प्रर्दशन प्रतिभा ढेकाळे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
Leave A Reply

Your email address will not be published.