ना.गुलाबराव पाटील यांनी केली पाहणी ; नुकसानभरपाई बाबत दिल्या सुचना
* शेतकऱ्यांशी साधला संवाद
जळगाव प्रतिनिधी दि.८:-
मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे जळगाव तालुक्यातील किनोद ,भोकर,पळासोड नांद्रा नांदगाव, पिलखेडे ,सावखेडा व भादली परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या या या नुकसान ग्रस्त गावांची पाहणी दौरा सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांनी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी शेतकाऱ्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांना २ दिवसात पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जळगांव तालुक्यातील २०-२२ गावांतील सुमारे २५० शेतकऱ्यांचे २७८ हेक्टर शेतातील केळी भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात ,कठोरा, किनोद, नांद्रा ,भोकर, पिलखेडे, गाढोदा, फुपनी, देवगाव, नांदगाव, सावखेडा,पळसोदसह परिसरात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी केली हेक्टरी ६० हजाराची मागणी
नांद्रा येथील नरेश नवाल, नांदगाव येथील राजेंद्र पाटील,गुलाब पाटील,गाढोदा येथिल तुकाराम पाटील,भोकर येथिल विश्वनाथ सोनवणे,दीपक पाटील,पळसोद येथिल योगराज पाटील , फुपनी व सावखेडा येथिल शेतकऱ्यांच्या शेतात दिवसभर राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील व अधिकारी यांनी पाहणी केली या प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी ना. गुलाबराव पाटील व अधिकारी यांच्याकडे हेक्टरी ६० हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली.यावेळी ना . पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.
भोकर येथिल दीपक कौतिक पाटील यांच्या शेतातील केळी पिकाच्या नुकसानी बरोबरच वादळी वाऱ्यात शॉक सर्किट मुळे
२ म्हशी व १ वासरू जळल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने हवालदिल झाले आहेत.
.यावेळी माजी सभापती राजेंद्र चव्हाण, कमलाकर पाटील, किशोर आगीवले, बालशेठ योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, रघुनाथ पवार, गजानन सोनवणे,,भरत पाटील,शुभम पाटील,संदीप पाटील,प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह प्रांताधिकारी तथा रो ह यो उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषिअधिकारी एल व्ही तलेले ,गटविकास अधिकारी एस पी सोनवणे,एम जी जंगले, विस्तार अधिकारी एम डी ढाके, सर्कल ,तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, व महसूल व कृषीचे अधिकारी उपस्थित होते.