वादग्रस्त वक्तव्य भोवले ; वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

0

बंगळुरु : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते व माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींवर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं.

या अगोदर एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर, दुसरीकडे औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितलेलं आहे.

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तो पर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.