वादग्रस्त पुस्तक लेखकाचा वरणगावला निषेध

0

वरणगाव  –  वादग्रस्त पुस्तक लेखक जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने तमाम हिंदू व मुस्लीम जनतेच्या भावना दुखावल्याने त्यांचा शहर कॅग्रेसच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत वरणगाव पोलीसात निवेदन देण्यात आहे

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल  यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची तुलना थेट महाराष्ट्रचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यान महाराष्टातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्याने शहरातील भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शहराच्या वतीने जाहीर निषेध नोंदवीत या वादग्रस्त पुस्तकावर त्वरीत बंदी घालून गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी  वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या वेळी करण्यात आली

निवेदन देतेवेळी  के बी काझी , डॉ राहुल भोईटे , डॉ अनुजा भोईटे , मनिषा मराठे शैलेश बोदडे , मुस्लीम अनसारी, अशफाक काझी, प्रकाश भैसे, मझर काझी मनोज देशमुख , राजु पालीमकर यांच्या सह कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.