वाणेगांव येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

0

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाणेगांव  येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी आर.एस. धस हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी पोलिस पाटील  नितीन जमदाडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी  गाडगेबाबांवर भाषणे करून स्वच्छतेचे महत्त्व समजावुन सांगितले .पोलिस पाटील नितीन जमदाडे यांच्या संकल्पनेतुन साजरी करण्यात आलेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात पाचोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी  आर. एस. धस, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र शिंदे, पोलिस पाटील नितीन जमदाडे, ग्रामसेवक नंदकिशोर पाटील, आत्माराम सोनवणे, दिलदार तडवी, गणेश धनके, गोपाल सोनवणे, निलेश लोहार, मनोज पाटील,अप्सर तडवी, भोला पाटील,अंगणवाडी सेविका शांताबाई मेटकर, रतन सोनवणे सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मिळुन परिसरातील स्वच्छता केली. कार्यक्रम सूत्रसंचालन  मुख्याध्यापक रविंद्र शिंदे यांनी तर आभार पल्लवी पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.