पाचोरा (प्रतिनिधी) :- गेल्या काही दोन महिन्यापासून पाचोरा शहरात सुस्थीत असलेले घरावरील जुनी मीटर तातडीने बदलवून नवी खोटाळ मिटर बसवून दुप्पट-तिप्पट बीले आकारली करून ग्राहकांची मोठी फसवणूक केलेली जात आहे.
शिवसेनेच्या वतीने उपोषण देखील करण्यात आले आपण लेखी आश्र्वासने देऊनही अघाप पावेतो कोणत्याही ग्राहकांची वाढीव बीले कमी करून दिली नाही. जुने मीटर बसविण्यात देखील आलेली नाही. हा जनता-जनार्दन विश्र्वासघात आहे आम्ही तो कदापी सहन करणार नाही याबाबत दिनांक 30 आॅगस्ट रोजी पावेतो अमंलबजावणी न केल्यास पुन्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उपोषण केले जाईल. होणाऱ्या परिणामाना आपण जबाबदार रहाल यावेळी पाचोरा शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुनिता किशोर पाटील, मंदाताई पाटील शिवसेना महिला आघाडी पाचोरा तालुकाप्रमुख, किरण पाटील शिवसेना महिला आघाडी पाचोरा शहरप्रमुख, उर्मिला शेळके, शिवसेना महिला आघाडी पाचोरा शहरप्रमुख, किशोर बारावकर शिवसेना पाचोरा शहरप्रमुख, संदीपरांजे पाटील युवासेना पाचोरा शहरप्रमुख, अनिकेत सुर्यवंशी युवासेना पाचोरा शहरप्रमुख, बंडू सोनार,उपस्थित होते.