वाढीव लाईट बिल कमी करा, अन्यथा तिव्र अंदोलनाचा शेतकरी बचाव कृती समिती चा इशारा..

0

मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब यांना  कृती समितीच्या वतीने निवेदन…

चाळीसगाव :-(प्रतिनिधी )

* शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले,या निवेदनात ,मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता  जबाबदार अधिकारी असतांना शेंडगे यांनी कुठलेही तांत्रिक आधार नसलेले वक्तव्य केलेत, जास्तीचे विज बिल याला ग्राहकच जबाबदार असल्याचे सांगून निराधार उडवाउडवीचे उत्तरे दिलीत, तसेच कनिष्ठ अभियंता सपकाळे नामक आधिकारी हे तर तक्रारदार ग्राहकांना सांगतात की, विजचोरी केल्यामुळे तुम्हाला ऐवढे बिल आले आहेत, याचा नेमका अर्थ काय समाजावेत? बेपरवाई अशी अधिकाऱ्यांचे वर्तन आहेत,*

 

तालुक्यतील शहरी व ग्रामीण भागात विज ग्राहकांची प्रचंड आर्थिक लुटमार केली जात आहे, महावितरणच्या मनमानी भोंगळ कारभारामुळे विज ग्राहकांना अंदाजे अव्वाच्या सव्वा लाईट बिल आकारले जात आहे, ग्रामीण भागातील काही विज ग्राहक अशिक्षीत अडाणी असल्यामुळे त्यांचा गैरफायदा उचलून महावितरणचे कर्मचारी वाट्टेल तशी पिळवणूक करीत आहे, प्रामुख्याने याचे दोन कारणे  असू शकतात, पहीले कारण निकृष्ट दर्जाचे विज मिटर दुसरे म्हणजे मिटर रेडींग घेणार्याचा निष्काळजीपणा, याचे ज्वलंत उदाहरण गणपूर तांडा येथील रामनाथ मंगतू चव्हाण या शेतकरी चे घरगुती वापरातील सिंगल फेज मीटरचे गेल्या डिसेंबर 2019 महिन्यातील ऐका महिन्याचे विज बिल तब्बल 55 हजारापेक्षा जास्त आलेले आहेत, तसेच  बोढरे तांड्यतील गणेश परेश राठोड यांचे विज बिल पाहता कशाप्रकारे अंदाजे बिल आकारून ग्राहकांची लुटमार केली जाते हे निदर्शनास येते, अशाप्रकारे तालुक्यात अनेकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार होत आहे,

जास्तीचे बिल कमी करून मिळावे यासाठी  महावितरण आधिकारी, कर्मचारी, यांच्याकडे ग्राहक गेले तर अधिकारी हमरीतुमरीची भाषा वापरतात,  ग्रामीण भागातील अशिक्षित अडाणी शेतकरी जास्तीचे बिल थोडे कमी करून मिळावे अशी विनंती करतात तेव्हा आधिकरी याचा गैरफायदा उचलतात व आपल्या मर्जीने थोडेफार पैसे कमी करून विज बिल भरायला सांगतात,

गणपुर तांड्यातील रामनाथ चव्हाण यांचे महीन्याचे 55 हजार रूपये बिलात 24 हजार रूपये कमी करून बाकी उर्वरीत 31.हजार रूपये टप्याटप्याने भरा असे अधिकाऱ्यांनी सांगितले हे नेमके अधिकार्यांनी कुठल्या आधारे सांगितले?  शिवाय ज्याचे बिल कमी करून भरायचे सांगितले जाते त्या व्यक्तीचे विज मिटर आधीच जप्त करून घेण्यात आलेले आहे, तसेच ग्राहकांच्या घरातील ऊपकरणे तपासली असता, दोन led. बल्ब, 1 पंखा 1 टिव्ही असा वापर आढळून आले आहे, हा मनमानी कारभार त्वरीत थांबवून ग्राहकांची आर्थिक लुटमार थांबविण्यात यावी अन्यथा कृती समितीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे,

निवेदन देतांना पत्रकार योगेश्वर राठोड, कृती समितीचे सचिव भिमराव जाधव, सामाजिक कार्यकर्ता विश्वजित नायक, ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड, सामाजिक कार्यकर्ता सुनिल चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.