जामनेर : – दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण दि.१७ मे रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.ना.गिरीष महाजन त्यांनी आज दि.१४ रोजी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे.लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी दुष्काळ ग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याने कोणालाही भेटणार नाही.त्यामुळे माझ्यावर प्रेम करणा-या मतदारांनी,पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार,पुष्पगुच्छ न घेता कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी,जाहिरात बाजी न करता त्यावरील खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधी मध्ये जमा करावा असे आवाहन ही ना. महाजन यांनी यावेळी केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,सिनेट सदस्य दिपक पाटील,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,तेजस पाटील आदी उपस्थित होते.@ बातमी सोबत गिरीश महाजन यांचा फोटो लावणे.