- सामूहिक वाढ दिवसाने दिला एकतेचा संदेश
- डॉ सुनील दादा राजपूत मित्र मंडळचा उपक्रम: 21कर्तृत्वाचा सत्कार
चाळीसगाव | प्रतिनिधी
जून म्हटला की संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने जन्म दिवस अर्थात वाढ दिवस साजरे केले जातात. यात आप्तेष्ट व मित्र मंडळी वाढ दिवस असणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन साजरे करतात मात्र चाळीसगावात डॉ. सुनील दादा राजपूत मित्र मंडळाने या वर्षी समाजात एक नाविन्याची प्रथाच तयार केली.ती म्हणजे समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचे वाढ दिवस असणाऱ्या या सर्वांना एकाच ठिकाणी आणून त्यांचा वाढ दिवस साजरा करून सामाजिक दृष्ट्या मान्यवरांसह सर्वांचा वेळ व श्रम यांची बचत करून समाजात नावीन्य निर्माण केले.
या त्यांच्या कार्याची दखल समाजाने घेऊन आज चाळीसगावात चर्चेचा विषय ठरला. या मुळे सर्वांना शुभेछ्या देणे सोयीचे झाले. यातून सर्वच गोष्टींची बचत होऊन समाज बळकट करण्यासाठी अश्याच गोष्टींची गरज असल्याचे सर्वांनी मान्य केले.
आगामी काळात लग्नाचा वाढदिवस असो नाहीतर जन्म दिवस असो अश्याच पद्धतीने साजरे करायला हवेत. यातून समाजात एकात्मतेचा संदेश जाऊन समजाच्या विकासाला चालना दिली जाऊ शकते. म्हणून समाजात नव्याने तयार होणाऱ्या वाढ दिवस प्रथेला चांगलाच धडा ह्या मित्र मंडळाने देऊन समाजाचे आपण देणे करी असल्याचे सिद्ध केले.
कार्यक्रमास खालील सत्कारार्थी मान्यवर उपस्थित होते . त्यात जेष्ठ माजी नगरसेवक व पर्यावरण प्रेमी केशव आप्पासाहेब कोतकर,शिवसेना विधान सभा परिक्षेत्र प्रमुख नानासाहेब भीमराव खलाने , संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मन बापू शिरसाठ,समाज शिक्षक बापुसाहेब नि.पवार,नगरसेवक सोमसिंग आबा राजपूत, नगरसेवक आनंद खरात ,नगरसेवक जगदीश भाऊ चौधरी,नगरसेवक बापूसाहेब अहिरे,उपक्रमशील शिक्षक दीपक पाटील, फेटेवाले सचिन महाले, पर्यवरण मित्र शाळीग्राम निकम ,सामाजिक कार्यकर्त सुनील घुले, नगरसेवक सदाशिव गवळी, उपक्रमशील शिक्षक गोकुळ पाटील,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चौधरी,जिल्हा कोळी संघाचे अध्यक्ष व नगरसेवक अण्णासाहेब कोळी,लोकमत वितरण विभाग प्रमुख श्रीकांत भामरे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राठोड,रोटरी मिल्क सिटी चे माझी अध्यक्ष रवींद्र शिरुडे ,डॉ,राजेंद्र माळी यांचा वाढ दिवस फेटे बांधून शाल, पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.
केशव आप्पा कोतकर यांनी आशीर्वाद पर मार्गदर्शन करताना गरज असेल तेहवा आवाज द्या सामाजिक कार्यसाठी सोबत असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तरदेताना श्री दीपक पाटील व शाळीग्राम निकम यांनी मित्र मंडळ च्या उपक्रमाचे कौतुक केले व समाज सशक्त करण्याच्या दृष्टीने करत असलेल्या कार्या साठी कायम चाळीसगाव कर सोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.
ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुनील दादा राजपूत यांनी केले. त्यात त्यांनी समाजासाठी मित्र मंडळ राबवत असलेले उपक्रम व आम्ही समाजाचे देणेदार असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.त्याच बरोबर आज समाज विभक्त झालाय आणि संवाद समाजातून लुप्त होत चाललाय, अशा वेळेस सामूहिक उपक्रम घडवून आणणे आणि एकमेंका मध्ये संवाद साधने अशा उपक्रमा द्वारे एक नवीन आदर्श व संदेश देण्याचे कार्य आज गावात घडले पाहिजे.चाळीसगाव पंच क्रोशीतील हे सर्व मान्यवर तोलामोलाचे सन्माननिय व्यक्तिमत्व , समाजसेवक,सर्व पक्षातील राजकारणी अशा सर्व हिऱ्याची माळ गूंफन्याच काम मित्र मंडळ द्वारा करण्यात येत असल्याचे डॉ सुनील दादा राजपूत यांनी सांगितले.
डॉ सुनीलदादा मित्र मंडळाचे सदस्य डॉ संतोष मालपुरे , प्रवीण जाधव, राहुल वाकलकर, स्वप्नील जाधव,आर्किटेक्ट संजय चौधरी, नितीन पाटील, भरत मेहता, श्री प्रदीप भांडारकर, श्रीकांत राजपूत, अनिल मालपुरे,प्रिंतेश कटारिया, आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ संतोष मालपुरे यांनी केले तर आभार प्रवीण जाधव यांनी मानलेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ सुनीलदादा मित्र मंडळातील पवन देवरे, संजय गोठवाल, अजय कुमावत यांनी परिश्रम घेतलेत.