Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय..
    मनोरंजन

    वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय..

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 11, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बच्चन हे अनेक जाहिराती करतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या जाहिरातींनी खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच बिग बींनी एका पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आले. आता ‘बिग बीं’नी या पान मसाला ब्रँडसोबतचा करार रद्द केला आहे.

    अमिताभ बच्चन यांनी अधिकृत निवेदन जारी करून या ब्रँडसोबतचा त्यांचा करार रद्द करण्याची माहिती दिली आहे. या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, बिग बींनी या ब्रँडपासून स्वतःला दूर केले आहे. कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी, अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि त्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

    असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा अमिताभ बच्चन या ब्रँडशी संबंधित होते, तेव्हा त्यांना माहित नव्हते की हे सरोगेट जाहिरातीखाली आले आहे. त्यांनी आता त्यांचा करार लेखी संपुष्टात आणला आहे आणि ब्रँडच्या जाहिरातीसाठी त्यांना देऊ केलेली फी देखील परत केली आहे.

    काही काळापूर्वी राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात असे म्हटले होते की, पान मसाला लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यात असेही लिहिले होते की, बिग बी पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यांनी ही अशी जाहिरात त्वरित सोडली पाहिजे.

    गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका चाहत्याला विचारले होते की, त्यांनी या ब्रँडला पाठींबा देण्याचे काम का निवडले? त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, मी माफी मागतो. जर कोणी कोणत्याही व्यवसायात चांगले करत असेल, तर आपण त्याच्याशी का संबंध ठेवत आहोत याचा विचार करू नये. होय, जर एखादा व्यवसाय असेल, तर त्यामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाचाही विचार करावा लागेल. आता तुम्हाला असे वाटते की, मी हे करायला नको होते. पण हो मला हे करून पैसे मिळतात आणि असे बरेच लोक आहेत जे आमच्या क्षेत्रात असं काम करत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Amitabh Bachchan Birthday Bachchan Birthday
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif