वाङे वाचनालयास जैन ईरीगेशन सिस्टीम मार्फत 1 लाख 7 हजारांची पुस्तके भेट

0

भङगाव, दि.28 –
जैन एरीगेशन सिस्टीम मार्फत जळगाव येथील उदयोगपती भवरलाल जैन यांच्या 81 वा वाढदिवसाच्या आयोजीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जैन एरीगेशनचे अशोक जैन यांच्या हस्ते भङगाव तालुक्यातील वाङे येथील नेताजी सुभाष ग्राम वाचनालयास एकुण 655 पुस्तके भेट देण्यात आले.
ही पुस्तके एकुण 1 लाख 7 हजार 25 रुपयांची आहेत. वाचनालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत संचालक मंङळाने आभार मानले आहेत. याकामी उदयानपंङीत पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. याबाबत माहीती अशी कि, तालुक्यातील वाङे येथील उदयानपंङीत पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेंद्र पाटील यांनी वाङे येथे मागील काळात 11 गाङया केळीच्या एकाच वेळी भरुन कार्यक्रम घङविला होता. या कार्यक्रमात उदयोगपती भवरलाल जैन यांचेकङे वाङे येथील वाचनालयास पुस्तके मिळावीत अशी मागणी करण्यात आली होती. राजेंद्र पाटील यांच्यामार्फत याबाबत पाठपुरावा सुरुच होता. जैन एरीगेशनचे अशोक जैन यांच्याकङे ही मागणी वाचनालयाच्या पञान्वये करण्यात आली. जळगाव येथे भवरलाल जैन यांचा 81 वा वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जैन एरीगेशन सिस्टीम मार्फत अशोक जैन यांच्या हस्ते पुस्तके वाङे वाचनालयास भेट देण्यात आली होती. यावेळी उदयानपंङीत शेतकरी राजेंद्र पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष दिनकरराव पाटील , उपाध्यक्ष शालीग्राम महाजन यांचेसह काही संचालक, हजर होते. भवरलाल जैन यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली. त्यामुळे संचालक मंङळासह नागरीकांनी जैन एरीगेशन सिस्टीमचे आभार मानले आहेत. याकामी राजेंद्र पाटील यांचेही अनमोल सहकार्य लाभले.वाङे वाचनालयाच्या दि. 20 रोजी झालेल्या मासीक बैठकीत आभार मानण्यात आले. या बैठकीस वाचनालयाचे अध्यक्ष दिनकरराव पाटील, उपाध्यक्ष शालीग्राम महाजन, सचिव लक्ष्मण कुंभार, उप सचिव नितीन पाटील, संचालक साहेबराव पाटील,गुलाबराव पाटील,गोविंद महाजन, सुरेश पाटील ,अशोक परदेशी, व रुमसिंग परदेशी, प्रा. संजय राजपुत, सरदार गोसावी आदि संचालक , ग्रंथपाल देविदास पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.